Latest

Manohar Joshi : मनोहर जोशींचे ‘छत्रपती संभाजीनगर’शी होते खास नाते, जाणून घ्या त्याविषयी

मोहन कारंडे

छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) हे छत्रपती संभाजीनगरचे जावई होते. शहरातील एकनाथनगर भागात त्यांची सासूरवाडी होती. १४ मे १९६४ रोजी सावित्रीबाई आणि श्रीमान दत्तात्रय हिंगवे यांची कन्या मंगल यांच्या समवेत ते विवाहबद्ध झाले. विवाहानंतर मंगल यांचे नांव अनघा असे करण्यात आले. मनोहर जोशी यांना उन्मेष हे सुपूत्र तर अस्मिता आणि नम्रता या दोन सुकन्या आहेत. अर्थात, ही मुले राजकारणापासून कोसोमैल दूर आहेत.

संबंधित बातम्या : 

अनघा यांचा जन्म २ जानेवारी १९४५ रोजी झाला. अनघा यांचे स्थळ हे मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या नात्यातील होते. जोशी यांची नोकरी, कोहिनूर संस्था, राजकारण, समाजकारणात अनघा यांनी त्यांना मोलाची साथ दिली. जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकदा सासूबाईंना भेटण्यासाठी एकनाथनगरात गेले होते. एकनाथनगरचे माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर म्हणाले की, हिगवे कुटुंबीय काही वर्षापूर्वी पुणे येथे स्थायिक झाले. त्यांचे मेव्हणे हे लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या साससूबाई आणि मेव्हणे हयात नाहीत अशी माहिती त्यांनी दिली.

Manohar Joshi : भाजप सभा आणि राजीनामा धडकला

मनोहर जोशी यांचे संभाजीनगरवर खूप प्रेम होते. पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही त्यांची देण. तत्कालिन आमदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांना गृहनिर्माण सारखे महत्वाचे खाते दिले होते. कालांतराने जोशी यांनी बाळासाहेबांच्या आदेशावरून एका क्षणात राजीनामा दिला. त्याचाही संभाजीनगरशी संबंध राहिला आहे. ३० आणि ३१ जानेवारी १९९९ रोजी भाजपची संभाजीनगरात बैठक होती. यानिमित्ताने प्रमोद महाजन व अन्य नेत्यांची सांस्कृतिक मंडळ मैदानावर सभा होती. पण जोशी यांच्या राजीनाम्याची बातमी आली अन् सभा बारगळली.

Manohar Joshi : अंबाजोगाई कुलदेवता

जोशी हे मूळ कोकणातील नांदवीचे. त्यांची कुलदेवता अंबाजोगाईची देवी. यानिमित्ताने वर्षभरातून एकदा तरी ते सहकुटुंब दर्शनाला येत असत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT