Latest

मनीष सिसोदिया यांची देव परीक्षा घेत आहे : अरविंद केजरीवाल

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क :   देव मनीष सिसोदियांची परीक्षाही घेत आहे आणि मनीष सिसोदिया १००/१०० क्रमांकाने उत्तीर्ण होतील. मनीष आज आमच्यासोबत नाहीत. पण ते लवकरच येतील. असा विश्‍वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि. १९ ) व्‍यक्‍त केला. दिल्लीतील शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. 
CM Arvind Kejriwal : सिसोदिया यांना अडकवण्यात आलं

यावेळी केजरीवाल म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे काही मुले आली हो., त्या मुलांनी सांगितले की, ते सर मनीषजींना खूप मिस करत आहेत. मी त्यांना सांगितले की आम्हालाही त्‍यांची खूप आठवण येत आहे. अनेक शिक्षकांना त्यांची आठवण येते. मनीष  यांच्यावर पूर्णपणे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांना या प्रकरणात अडकवण्यात  आले आहे. त्यांना यावेळी मी सांगितले की जगाला माहीत आहे की, सिसोदिया यांना निराधार आरोपांमध्‍ये अडकवण्‍यात आले आहे.

'सिसोदिया १०० पैकी १०० गुणांनी उत्तीर्ण होतील'

उद्घाटन समारंभावेळी केजरीवाल यांनी सांगितले की, "मनीष सिसोदिया यांनी तुम्हाला संदेश पाठवला आहे की,  मी पूर्णपणे ठीक आहे, काळजी करू नका, तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुरुंगातही त्‍यांना तुमच्या अभ्यासाची काळजी वाटते. आपल्या सर्वांना माहित आहे की, जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता तेव्हा कधी कधी देव कुठेतरी तुमची परीक्षा घेतो.  देव मनीष यांची परीक्षा घेत आहे आणि ते १००/१०० क्रमांकाने उत्तीर्ण होतील आणि लवकरच तुमच्यासोबत परत येतील."

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT