Latest

Manipur Violence : इंफाळमध्ये सुरक्षा दल आणि जमावात धुमश्चक्री, 2 जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमधील हिंसाचार दिवसेंदिवस चिघळत आहे. दरम्यान मणिपूरमध्ये आणखी एक घटना समोर आली आहे. इम्फाळमध्ये रात्रभर सुरक्षा दल आणि जमावात धुमश्चक्री सुरू आहे. यात दोन नागरिक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भाजप नेत्यांची घरे जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. (Manipur Violence )

पोलिसांच्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवई येथे रात्रीच्या वेळी स्वयंचलित गोळीबार झाला. इंफाळ पश्चिम येथील इरिंगबम पोलीस ठाण्यातूनही शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणतीही शस्त्रे चोरीला गेली नाहीत. दंगलखोरांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्सने इंफाळ येथे मध्यरात्रीपर्यंत संयुक्त मोर्चा काढला. अंदाजे १,००० लोकांच्या जमावाने राजवाड्याजवळील इमारती जाळण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी आरएएफने अश्रुधुराच्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या. आणखी एका जमावाने आमदार विश्वजीत यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT