Ashish Deshmukh : आशिष देशमुखांचा उद्या भाजप प्रवेश; नितीन गडकरींची घेतली भेट

Ashish Deshmukh : आशिष देशमुखांचा उद्या भाजप प्रवेश; नितीन गडकरींची घेतली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते आशिष देशमुख हे उद्या नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पक्षविरोधी वक्तव्य केल्याने काँग्रेसने सहा वर्षांच्या कालावधीसाठी त्यांचे निष्कासन केले होते.

गडकरी यांच्या भेटीनंतर आशिष देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपुलकीच्या भावनेतून गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत घरचे संबंध आहेत. त्यांच्या आशीर्वादाने राजकीय वाटचाल यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काल शिर्डी येथे साईबाबांचे सयंम, श्रद्धा आणि सबूरी हे आशीर्वाद घेतले आहेत. त्यानुसार पुढील वाटचाल संयमानेच राहील. भाजपकडे आमदारकी किंवा खासदारकीची मागणी केलेली नाही. पक्ष जी भूमिका घेईल किंवा कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news