राज्यात ‘नशामुक्त भारत पंधरवडा’; अमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध जनजागृतीसाठी केंद्राचा पुढाकार

राज्यात ‘नशामुक्त भारत पंधरवडा’; अमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध जनजागृतीसाठी केंद्राचा पुढाकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत अमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी 'ड्रग्समुक्त भारत'चा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 26 जूनपर्यंत राज्यात नशामुक्त पंधरवडा जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
अंंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत व धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा या 'नशामुक्त भारत' पंधरवडा कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यानुषंगाने राज्यात 'नशामुक्त भारत' पंधरवडा उपक्रमांतर्गत व्यापकस्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य पदार्थसेवन विरोधी दिन (26 जून) या दिनाचे औचित्य साधून जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियान राबविण्यासंदर्भात सूचित केले आहे.

राज्यात नशामुक्त भारत पंधरवडाअंतर्गत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी नशामुक्त भारत अभियान समिती व व्यसनमुक्ती केंद्राच्या साहाय्याने समयबद्ध कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्यसेवन विरोधी दिन व नशामुक्त भारत पंधरवड्याचे आयोजन विद्यापीठ, महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था, अनुदानित संस्था, सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालये, अपंग संस्था, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादी कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नशामुक्त भारतचे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात व्यापकस्तरावर पंधरवड्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
                                       – सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय विभाग  

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news