Latest

Manipur election 2022 : मतदान सुरू असताना भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये आज (शनिवार) विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि अखेरच्या टप्यासाठी मतदान होत आहे. दरम्यान यावेळी झालेल्या हिंसाचारात गोळी लागून भाजप (BJP) कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा गोळीबार काँग्रेस कार्यकर्त्यांने केल्याचे सांगितले जात आहे. अमुबा सिंह (वय २५) असे मृत्यूमूखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे एका निलंबित केलेल्या भाजप नेत्याच्या घरासमोर क्रुड बॉम्ब फोडल्याची घटना घडली आहे.

 दरम्यान, कोविड नियमांच्या पार्श्वभूमीवर येथे १२४७ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून निमलष्कराचे २० हजार जवान तैनात करण्यात आली आहे. अखेरच्या टप्प्यात एकूण ८ लाख ३८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ लाख २८ हजार महिला मतदार आहेत. तर २२३ मतदान केंद्रांना गुलाबी बूथ बनवण्यात आले आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

या टप्प्यात प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यात तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओ इबोबी सिंग आणि माजी उपमुख्यमंत्री गायखंगम गंगमाई यांचा समावेश आहे. हे दोघेही काँग्रेसचे उमेदवार आहेत. राज्यातील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २८ फेब्रुवारी रोजी ३८ विधानसभा जागांसाठी मतदान झाले. १० मार्चला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात

SCROLL FOR NEXT