Latest

Malaika Arora : रॅम्प वॉक करताना बोल्ड झाली मलायका, ट्रोलर्सच्या निशाण्यावर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लॅक्मे फॅशन वीक २०२२ हा फॅशन शो मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध डिझायनर्ससाठी सुप्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री रॅम्प वॉक करताना दिसले. (Malaika Arora ) दरम्यान, या शोचा एक भाग असलेल्या मलायका अरोराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती या कार्यक्रमात रॅम्पवर चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच काही लोक मलायकाची स्टाईल पाहून कौतुक करत आहेत. तर काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (Malaika Arora )

एका युजरने कमेंट करत लिहिले – जबरदस्तीने तरुण दिसण्याचा प्रयत्न करत आहे.

काल मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये मलायका अरोरा हिने रॅम्प वॉक केला, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, तिने जांभळ्या रंगाचा बिकिनी टॉप घातला आहे आणि ए लाईन फिटींग स्कर्ट परिधान केला आहे. त्याचबरोबर, ओव्हरसाईज श्रगदेखील घातले आहे. तिने जबरदस्त ड्रेससह हाय हील्सदेखील घातल्या होत्या आणि न्यूड मेकअपही केला होता. व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोलर्सनी मलायकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. युजर्सपैकी एकाने कमेंट करून लिहिले आहे की, जबरदस्तीने तरुण दिसण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, आंटी फक्त आंटीसारखी दिसत आहे.

त्याचबरोबर काही युजर्सनी तिच्या लूकचे कौतुकही केले आहे. एका यूजरने मलायकाची स्तुती करताना म्हटले आहे की, या लोकांनी हे सिद्ध केले आहे की वय फक्त एक आकडा आहे बाकी काही नाही.

मलायका तिची बहीण अमृता अरोरासोबत ओटीटीवर दिसणार आहे. खरंतर दोन्ही बहिणी लवकरच एक शो घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे अरोरा सिस्टर्स. एका वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, मलायकाने तिचा माजी पती अरबाज खान आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांना शोमध्ये खास पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. मलायका शोमध्ये अरबाज आणि अर्जुन यांच्या समीकरणावर बोलणार आहे. दोघेही एकत्र दिसणार नसले तरी. दोघांचे एपिसोड वेगळे असणार आहेत. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT