Latest

लोणंद : महाराष्ट्र बॅंकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न

backup backup

लोणंद, पुढारी वृतसेवा : जागरुक नागरिक व पोलिसांच्या तप्तरतेमुळे लोणंद शहरात चोरट्यांचा एटीएम फोडण्‍याचा डाव हाणून पाडण्‍यात आला. यावेळी पाेलिसांनी चोरट्यांच्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलागही केला. पण, चोरटे पसार झाले.

लोणंद शहरातील रेस्ट हाऊसजवळ पुणे-सातारा रोडवर बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आहे. आज रविवार (दि. 28) रोजी पहाटे निळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी आरसीसी इमारतीच्या गाळ्यामध्ये असणारे एटीएमचा डिसप्ले फोडला.

डिसप्ले फोडतानाचा आवाज झाल्याने समोरच रहात असलेले सागर शेळके आणि सचिन पानवकर यांना आला. त्यांनी त्वरित सपोनि विशाल वायकर यांना फोन केला. या दरम्यान लोक जागे झाल्याचे पाहिल्याने चोरट्यांनी पलायन केले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

चोरट्यांनी पलायन करताना पोलिसांना चकवा देण्यासाठी गाडी प्रथमतः निरा रोड, त्यानंतर शिरवळ रोड त्यांनंतर पुन्हा घटनास्थळा समोरूनच फलटण रोडकडे नेली. सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिनेमा स्टाईलने स्कार्पिओचा फलटण रोडने पाठलाग केला. परंतु चोरटे पसार झाले.

जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तप्तरतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडून चोरी करण्याचा डाव फसला. याबाबत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना केली आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली. तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत. जागरूक नागरिक सागर रामचंद्र  शेळके आणि सचिन शरद पानवकर यांचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT