Latest

कल्याण : चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर

backup backup

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : सहा महिन्यांपूर्वी डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप एका दीड वर्षाच्या चिमुरडीच्या आई-वडिलांनी डॉक्टरांवर केला होता. मात्र पोलिसांनी त्याची विशेष दखल घेतली नसल्याचे सांगत हे आई-वडील थेट न्यायालयात गेले आहेत. त्यांनतर न्यायाधिशांनी पुरलेले मृतदेह परत काढून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावे, असा निकाल दिला आहे. त्यामुळे लॅबकडून येणाऱ्या निकालाकडे पालकांचे डोळे लागले असल्याचे आई वडिलांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात मुन्नी सहानी या कुटूंबासह राहतात. तर याच भागात आरोपी डॉक्टर मोहंमद ताज अन्सारी (वय 45 वर्षे), डॉ. एस. एम. आलम (वय 45 वर्षे) या दोन डॉक्टरांचे हसन क्लिनिक, नावाने छोटेसे क्लिनिक आहे. मुन्नी सहानी यांची लहान मुलगी नेहा आजारी असल्याने 5 जुलै, 2021 रोजी हसन क्लिनिकमध्ये दुपारच्या सुमारास मुलीला घेऊन उपचारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिची तपासणी करून डॉक्टर मोहंमद अन्सारी यांनी डॉ. आलम यांच्या लेटरहेडवर नेहाला औषधे लिहून देत ती औषधे चिमुरडीला देण्यास तिच्या आईला सांगितले.

मात्र, त्या औषधांचे सेवन केल्याने नेहाची प्रकृती अधिक गंभीर झाली होती. त्यामुळे पुन्हा 6 जुलै रोजी नेहाची आईला तिला पुन्हा हसन क्लिनिकमधील डॉक्टराकडे घेऊन गेली. मात्र, त्याच दिवशी सांयकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर टिळक नगर पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मुलीचा मृतदेह घेऊन गेलो, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने शेवटी मुलीचे दफन केले. त्यानंतर थेट न्यायलायात जाण्याचे ठरवले अशी माहिती चिमुरडीच्या आईने दिली.

सद्यस्थितीत तिचा पुरलेला मृतदेह उकरून काढा आणि त्याच शवविच्छेदन करा असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर 3 जानेवारी, 2022 रोजी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या उपस्थितीत पोलीस आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. आता मृतदेहाच्या सांगाड्याचे सॅम्पल घेऊन मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहेत. फॉरेन्सीक लॅबचा अहवालातून मुलीच्या मृत्यूचे कारण बाहेर येऊ शकते, असे मृत मुलींच्या पालकांनी सांगितले.

हे ही वाचलत का?

SCROLL FOR NEXT