Latest

आधार-पॅन लिंक करण्‍याचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.नवीन माहितीनुसार, पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ( PAN-Aadhaar linking ) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

याबाबत पीआयबीने ट्विट केले आहे की, करदात्यांना काहीसा दिलासा देत आधारला पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती; पण आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तीन महिन्यांची मुदत दिली जात आहे. आता ३१ मार्च २०२३   या मुदतीपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT