Leopard : बिजनौरच्या बिबट्यांवर ‘कुणी घर देता का घर?’ म्हणण्याची आली वेळ! विचित्र समस्येने वनअधिकारी पेचात | पुढारी

Leopard : बिजनौरच्या बिबट्यांवर 'कुणी घर देता का घर?' म्हणण्याची आली वेळ! विचित्र समस्येने वनअधिकारी पेचात

पुढारी ऑनलाइन डेस्क : Leopard : बिजनौर येथे निर्माण झालेल्या एका विचित्र समस्येने वनअधिकारी चांगलेच पेचात अडकले आहे. मानवी वस्तीत पकडलेल्या बिबट्यांना एटीआर जंगलातील वाघांनी या बिबट्यांना जंगलात घेण्यास नकार दिला आहे. हे बिबट्या Leopard नरभक्षी नसल्याने त्यांना प्राणीसंग्रहालयातही सोडता येत नाही. त्यामुळे बिबट्यांवर आता कोणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे.

अमनगड व्याघ्र प्रकल्पातील(एटीआर) वनपालांनी याची माहिती दिली आहे. वनअधिकारी म्हणाले, गेल्या दोन महिन्यांत त्यांनी मानवी वस्तीतून सहा बिबट्यांना Leopard सापळ्यात अडकवून त्यांची सुटका केली. त्यांना ATR जंगलात सोडले. मात्र जंगलातील वाघांनी त्यांना पुन्हा खेडे आणि शेताच्या जवळ असलेल्या जंगलाच्या किनारी भागात हाकलून लावले. आता हे बिबट्या स्क्वेअर वन वर परत आले आहे.
वन अधिकारी म्हणाले, “वाघ त्यांच्या प्रदेशाबाबत अत्यंत स्वाभिमानी असतात आणि ATR मधील जागेच्या कमतरतेमुळे ते इतर कोणत्याही शिकारी प्राण्याला त्यांच्या क्षेत्रात वाढू देत नाहीत, परिणामी प्राण्यांमध्ये हद्दीवरून युद्धे होतात.”

Leopard : म्हणून बिबट्यांना प्राणीसंग्रहालयात सोडता येत नाही

सुटका करण्यात आलेल्या बिबट्याला Leopard प्राणीसंग्रहालयात का सोडण्यात आले नाही, असे विचारले असता बिजनौरचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) अरुण कुमार सिंग म्हणाले, “बिबट्याची सुटका केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. जर तो मनुष्यभक्षक किंवा शिकार करण्यासाठी, अयोग्य असल्याचे आढळून आले तरच त्यांना प्राणीसंग्रहालयात पाठवले जाते. अन्यथा, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे आपल्यासाठी बंधनकारक आहे.”

अलीकडील काळात बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढला आहे. बिबट्यांच्या Leopard अधीवासाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा संघर्ष वाढला आहे.

दुसरीकडे, 2012 मध्ये आरक्षित म्हणून अधिसूचित झाल्यानंतर 13 वाघांसह सुरू झालेल्या ATR मध्ये 2022 च्या गणनेनुसार सध्या 27 वाघ आहेत. हे वाघ या बिबट्यांना जंगलात येऊ देत नाही, ते त्यांना जंगलाच्या किनारी भागात हाकलून लावतात.

हे ही वाचा :

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

Back to top button