Latest

कोण होणार करोडपती पुन्हा येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम घराघरांत पोहोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतं. हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या गेल्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरांत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आपला आवाज यांमुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.

प्रत्येक खेळात कोणी जिंकतं किंवा कोणी हरतं. पण, या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो आला आहे. २३ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान या खेळात सहभागी होण्यासाठीचे प्रश्न सुरू होतील.

करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहे.

आता ज्ञानाच्या जोरावर यशाची शिखरं गाठायला तयार राहा, कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येते आहे-हा कार्यक्रम.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT