Latest

कोल्हापुरातील सैनिक टाकळीच्या युवकाचा निपाणीत निर्घृण खून

स्वालिया न. शिकलगार

निपाणी : पुढारी वृत्तसेवा

सैनिक टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेल्या अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय २१) या युवकावर तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना रविवारी मध्यरात्री येथील निराळे गल्ली (nipani murder) येथे घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघे संशयित फरार झाले आहेत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (nipani murder)

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निपाणी पोलिसांनी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. अभिषेक हा मूळचा सैनिक टाकळी येथील रहिवासी असून तो येथील एका चित्रपटगृहात कामावर आहे. तो आपल्या आईसह येथील निराळे गल्लीत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तो चित्रपटगृहातील काम आटोपून आपल्या घरात प्रवेश करीत असताना दारातच दबा धरून बसलेल्या तिघा जणांनी आर्थिक व्यवहारातून अभिषेकवर चाकूने हल्ला चढवला.

यावेळी झालेल्या मारहाणीत अभिषेक हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती मिळताच ठाणे अंमलदार रमेश तळवार, हवालदार विनोद असोदे यांच्यासह उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांची जादा कुमक मागवून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला.

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तातडीने घटनास्थळी चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक ( डीएसपी) बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन पाहणी केली. शहर पोलीसांनी पुढील तपास चालवला आहे. अचानकपणे निपाणी शहरात हा प्रकार घडल्याने शहर हादरले आहे.

हल्लेखोर तिघा मित्रांनी अभिषेक याचा किरकोळ रकमेच्या व्यवहारातून हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी अभिषेकवर हल्ला केलेला चाकू रॉड यासह आदी साहित्य जप्त केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT