Latest

कोल्हापूर : अब्दुललाट श्री दत्त देवस्थानचे आण्णा महाराज यांचे निधन

अनुराधा कोरवी

अब्दुललाट ; पुढारी वृत्तसेवा : अब्दुललाट (जि. कोल्हापूर ता. शिरोळ) येथील श्री दत्त देवस्थानचे परमपूज्य सदगुरू आण्णा महाराज यांचे सकाळी साडेआठ वाजता वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. आण्णा महाराज यांच्या निधनाने पंचक्रोशीसह शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

अब्दुललाट, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडीसह पंचक्रोशीतील गावातील शाळा, कॉलेज, सहकारी संस्था, किराणा दुकाने बंद ठेवून दुखवटा व्यक्त करण्यात आला. अंत्‍यदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह  कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणांहून भाविक येत आहेत. सूर्यास्तापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT