पंतप्रधानांच्‍या ‘त्‍या’ विधानावर महाराष्‍ट्र सरकारने खुलासा करावा : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
महाराष्‍ट्र काँग्रेसमुळेच कोरोना पसरल्‍याचा आराेप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याबाबत महाराष्‍ट्र सरकारनेच खुलासा करावा, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केले. प्रत्‍येक विधानावर मी बोलणे योग्‍य नाही, असेही ते म्‍हणाले.

जगभरात कोरोना महामारी आहे. कोरोनाचा उगम चीनमध्‍ये झाला आहे. त्‍यामुळे महाराष्‍ट्रसारख्‍या राज्‍यावर खापर फोडणे हेच चुकीचे आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्‍या धारावी पॅटर्नचे जागतिक आरोग्‍य संघटनेने कौतुक केले आहे, असेही संजय राऊत यावेळी  म्‍हणाले.

महाराष्‍ट्र काँग्रेसमुळेच कोरोना पसरल्‍याचा आराेप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. यावर सविस्‍तर विधान हे मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  करावे.  पंतप्रधान माेदी यांनी  महाराष्‍ट्र सरकार आराेप केला आहे. त्‍यामुळे याबाबत महाराष्‍ट्र सरकारनेच यावर खुलासा करण्‍याची गरज असल्‍याचेही ते म्‍हणाले.

भाजप किरिट सोमय्‍या यांच्‍यावर हल्‍ला झाला असेल तर कायदा आपलं काम करेल. कोणत्‍याही हल्‍ल्‍याचे आम्‍ही समर्थन करणार नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

महागाईला जागतिक परिस्‍थिती कारणीभूत असते. याचा अर्थ सर्वसामान्‍य नागरिकांना महागाईचा खाईट लाटावे असे होत नाहीत. महागाई रोखण्‍यासाठी केंद्र सरकारला ठोस उपाययोजना कराव्‍याच लागतील, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news