Latest

Tanvi mundle : कुडाळची तन्वी कशी झाली मराठी अभिनेत्री?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोकणातील मुलगी तन्वी मुंडले (Tanvi mundle) ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. सुंदर तन्वी मुंडले ही कुडाळची आहे. नाटक, मालिका असा तिचा अभिनयातील आजपर्यंतचा प्रवास आहे. पाहिले न मी तुला ही तिची छोट्या पडद्यावरील मालिका होती. (Tanvi mundle) या मालिकेतील तिची भूमिकाही गाजली. आता ती नव्या मालिकेत दिसणार असून निवेदिता सराफ जोशी या दिग्गज अभिनेत्रीसोबत ती झळकणार आहे. तुम्हाला माहितीये का कोकणाची मुलगी ते मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री ती कशी झाली?

तन्वीची कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नाही. तरीही तिने अभियाच्या जोरावर तिने हे यश मिळवलंय. 'पाहिले न मी तुला' या मालिकेत तिने काम केलंय. त्यात 'मनू' ही भूमिका तिने साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. तिचं भाषेसाठीही कौतुक झालं. तन्वी मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची आहे.

'बाबा वर्धम्' या नाटकाच्या ग्रुपमधून ती अभिनय क्षेत्रात आली. तिने बीएसस्सी फिजिक्समधून पदवी घेतलीय. सुंदर आणि भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या या कोकणकन्येनं प्रायोगिक नाट्यातून सुरुवात केली होती. राज्यनाट्य, एकांकिका, युथ फेस्टिव्हल अशा स्पर्धेत तिने काम केलंय.

पुढे अभिनय शिकण्यासाठी ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. सुरुवातीला तीन वर्षं दिवसभर फक्त नाटकं केल्याचे तिने म्हटलं. यानंतर तिला पाहिले न मी तुला ही पहिली मालिका तिला मिळाली होती. आता ती भाग्य दिले तू मला या मालिकेतही दिसतेय.

गुहागरच्या आठवणी केल्या शेअर

तन्वीची नव्या मालिकेत कावेरी नावाची भूमिका आहे. तन्वीने गुहागर शूटिंग दरम्यानचे काही किस्से सांगितले. शिवाय तिने काही आठवणीतील फोटोही शेअर केले आहेत. ती म्हणाली, "खूपच मज्जा आली, मी स्वत: कोकणची असले तरीदेखील मी पहिल्यांदाच गुहागर ठिकाणी कामासाठी म्हणून आले. खूप कमाल अनुभव होता. प्रत्येकचं गोष्ट खूप सुंदर होती. मग समुद्र असो वा छोट्या छोट्या पायवाटा असो, सगळं हिरवगार… सगळं असं खूप समृध्द आपण म्हणतो ना तसं होतं. मी पाहिल्यांदा साडी नेसून सायकल चालवली, हा अनुभव खूप मस्त होता. मुंबईमध्ये आल्यावर मी माझ्या सायकलला खूप मिस करते आहे. आठवण येते आहे मला तिची. आम्ही शूटिंग तर केलंच पण, तिथून अनेक आठवणी घेऊन आलो आहोत. हा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील".

SCROLL FOR NEXT