

पुढारी ऑनलाईन: मराठी अभिनेत्री प्रिया बापट नेहमी नवनवीन फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. प्रियाने सध्या सर्वात बोल्ड फोटोशूट करून चाहत्यांना धक्का दिला आहे. प्रियाच्या या फोटोचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
नुकतेच अभिनेत्री प्रिया बापट तिच्या इंन्स्टाग्रामवर दोन बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियाने निळ्या रंगाचा डेनिममध्ये हटके पोझ दिल्या आहेत. यातील खास म्हणजे, तिने पहिल्यादाच शर्टची बटन्स काढत हॉट फोटोशूट केलं आहे. प्रियाच्या हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूटने चाहत्याचे लक्ष वेधले आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Born with good jeans! ?'. लिहिले आहे. यावेळी तिच्या मोकळ्या केसांनी आणि मेकअपमुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात मराठी अभिनेत्री हर्ता दुर्गुळेने या फोटोवर कॉमेन्टस करताना हार्ट ईमोजी शेअर केला आहे.
अभिनेता जितेंद्र जोशी यांनी 'आता काय ऐकत नाय आपन ????' असे कॉमेन्टस करताना म्हटले आहे. तर अभिनेता आणि निर्माता आदीनाथ कोठारेने फायचा ईमोजी शेअर फोटोला दाद दिली आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी देखील जाळ, धूर संगटच अशा प्रतिक्रिया देत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. प्रियाच्या या फोटोंना काही वेळेतच २८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय प्रियाचे मरूम रंगाच्या ड्रेसमधील काही हटके फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत.
प्रियाने साधारण पाच वर्षांची असताना 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक'या नाटकातून अभिनयाला सुरूवात केली. यानंतर प्रियाने 'काकस्पर्श', 'टाईमपास २', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' हे मराठी चित्रपट आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' सारख्या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. यानंतर ती 'मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स' आणि 'आणि काय हवं' या वेबसिरीजमध्ये दिसली.
हेही वाचलंत का?