Latest

Kirit Somaiya Tweet : कोण असतील 2023 मध्ये किरीट सोमय्यांच्या रडारवर?

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (दि.३१)  २०२३ या नव्या वर्षात आपले नवे निशाणे कोण असणार आहेत. याविषयी ट्विट (Kirit Somaiya Tweet) करत मीहिती दिली आहे. यामध्ये काही नेत्यांची नावे जाहीर केले आहेत. सोबत २८ सेंकदाचा व्हिडिओही ट्विट केला आहे.

२०२२ मध्ये महाराष्ट्राने अनेक राजकीय स्थित्यंतर अनु‍भवली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर घोट्याळ्यांचे आरोप केले होते. आज त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर २८ सेंकदाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी उद्यापासून (दि. १ जानेवारी ) सुरू होणाऱ्या नवीन वर्षात (२०२३) आपल्या निशाण्यावर कोण असतील, याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीतील म्हणजे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्षातील नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. या वेळी त्यांनी भाजपा महाराष्ट्र आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग  केलं आहे.

Kirit Somaiya Tweet : नवे वर्ष, नवे निशाणे

किरिट सोमय्या यांनी जाहीर केलेल्या यादी पुढीलप्रमाणे 

  • ठाकरे परिवाराचे १९ बंगले
  • अनिल परब
  • हसन मुश्रीफ
  • असलम खानचे स्टुडिओ
  • किशोरी पेडणेकर
  • एस. आर. ए .सदनिका
  • मुंबई महापालिका

यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार असल्याचे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

हेही वाचा

SCROLL FOR NEXT