

पुढारी वृत्तसेवा, घाटकोपर: Mumbai : घाटकोपरच्या असल्फा विभागात ७२ इंचाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. पाण्याचा इतका प्रचंड पाण्याचा फवारा आणि प्रवाह होता की या रस्त्याला २० फूट खोल खड्डा पडला होता. या पाण्याच्या प्रवाहात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे. रात्री झोपेत असताना लोकांच्या घरात पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला.
Mumbai : असल्फा पाईप लाईन विभागात ब्रिटिशकालीन ७२ इंचाची जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहे. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुंबई मनपाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्ध पातळीवर या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र याचा फटका घाटकोपर, चांदीवली, साकीनाका इत्यादी परिसराला बसणार असून या विभागात काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी आज येणार नसल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा :