Opposition’s PM Face : 2024 च्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधी असणार – काँग्रेस नेते कमलनाथ | पुढारी

Opposition's PM Face : 2024 च्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधी असणार - काँग्रेस नेते कमलनाथ

पुढारी ऑनलाइन डेस्क : Opposition’s PM Face : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधी असतील, असे काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे.

कमलनाथ यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या देशव्यापी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व केल्याबद्दल राहुल गांधीचे कौतुक केले. कमलनाथ म्हणाले की राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाहीत तर देशातील सामान्य लोकांसाठी करत आहेत. जिथ पर्यंत 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा संबंध आहे राहुल गांधी केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील असतील, असे ते म्हणाले.

Opposition’s PM Face : भारत जोडो यात्रेइतकी प्रदीर्घ पदयात्रा जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणीही काढलेली नाही. तसेच गांधी घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कुटुंबाने देशासाठी इतके बलिदान दिलेले नाही, असे कमलनाथ यांनी सांगितले. “राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाहीत, तर देशातील जनतेसाठी जे कोणालाही सत्तेवर बसवतात,” ते म्हणाले.2024 च्या निवडणुकीसाठी राहुल गांधींच्या उमेदवारीच्या बाजूने पुढे आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हे एकमेव नेते आहेत.

देशद्रोहींसाठी पक्षात कोणतेही स्थान नाही

कमलनाथ यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबाबत ही वक्तव्य केले. ते म्हणाले देशद्रोहींसाठी पक्षात कोणतेही स्थान नाही. यावेळी त्यांना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यातेबाबत विचारले असता, ते म्हणाले, मी कोणत्याही व्यक्तीवर भाष्य करणार नाही, परंतु ज्या देशद्रोह्यांनी पक्षाचा विश्वासघात केला आणि कार्यकर्त्यांचा विश्वास तोडला, त्यांना पक्षात पुन्हा स्थान नाही.

हे ही वाचा :

Corona : कोरोनावरील पॅक्सलोव्हिड औषधाची पहिली जेनेरिक आवृत्ती काढण्याचा मान भारताला! WHO चा हिरवा कंदील

नववर्षाच्या स्वागताला पुणेकर सज्ज; हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आणि क्लबला हाऊसफुल्ल बुकिंग

Back to top button