Latest

ईडीच्या नावानं धमक्या देऊन सोमय्यांनी शेकडो कोटी रुपये उकळले : संजय राऊत

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

ईडीच्या नावानं धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी शेकडो कोटी रुपये गोळा केले, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सोमय्यांनी ईडीच्या नावानं धमक्या दिल्यात. सोमय्या पिता-पुत्र नक्कीच जेलमध्ये जाणार, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

त्यांनी प्रसारमाध्यमासी बोलताना किरीट सोमय्या कोण आहे? असा उपाहासात्मक प्रश्नदेखील उपस्थित केला. १९ बंगले कुठे आहेत? काल आव्हान दिलं आहे तर बंगले कुठे आहेत? संजय राऊतांची बेनामी संपत्ती कुठे आहे, मग का शोधून दाखवलं नाही? हा माझा प्रश्न आहे, उत्तरे द्या; असे म्हणत राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली.

राऊत पुढे म्हणाले, सोमय्यांनी १०० कोटींपैकी १५ कोटी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले. ईडीची धमकी देऊन १०० कोटींचा भूखंड मित्राच्या नावावर केला. शेकडो रुपये ईडीच्या धमक्या देऊन गोळा केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT