Latest

Karnataka Government : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरुद्ध डी. के. शिवकुमारांची तक्रार

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेस सरकार अस्तित्वात येऊन महिनाभराचा कालावधी उलटला नाही तोच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली येथे पक्षनेत्यांकडे तक्रार केली असून, सिद्धरामय्यांच्या समर्थकांना समज देण्याची मागणी केली आहे. (Karnataka Government)

विधान परिषद सदस्य निवडीमध्ये मुख्यमंत्री मनमानी करत आहेत. अधिका़र्‍यांच्या बदल्यांमध्येही हस्तक्षेप करत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात काही व्यक्ती कार्यरत असून ते प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करत आहेत. नगरविकासमंत्री भैरती सुरेश यांचा हस्तक्षेप वाढला असून मुख्यमंत्र्यांच्या पुत्राकडून त्यांची पाठराखण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांकडे समस्या मांडण्याची संधी मिळत नाही, अशी शिवकुमार यांची तक्रार आहे. (Karnataka Government)

उपमुख्यमंत्री शिवकुमार बुधवारपासून दिल्ली भेटीवर आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिद्धरामय्या यांचे समर्थक वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यांना योग्य ती समज द्यावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्री असणार आहेत, असे वक्तव्य मंत्री एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, एच. सी. महादेवप्पा आदी करत आहेत. हे योग्य नसून पक्षाचे निर्णय उघड करणे बरोबर नाही. विधान परिषदेमध्ये पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. परंतु, पक्षात अलीकडे प्रवेश केलेल्या सुदाम दास यांना संधी देण्यात येत आहे. हे योग्य नाही, अशीही तक्रार करण्यात आली आहे. (Karnataka Government)

              हेही वाचा :

SCROLL FOR NEXT