Latest

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचे मेल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्या यांच्‍यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचे मेल आले आहेत. सीसीबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

कर्नाटक सरकारला सोमवारी (दि.५) बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये  मेल पाठवणाऱ्याने शनिवारी (दि.९) बंगळूरमध्ये स्फोटाचा इशारा दिला आहे. ईमेलमध्ये दुपारी 2.48 वाजता शहर हादरेल, असे देखील म्हटले आहे. हा मेल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्री आणि बेंगळुरूचे पोलीस आयुक्त यांना उद्देशून होता आणि तो शाहिद खान नावाच्या व्यक्तीने पाठवला होता, असेही 'इंडिया टुडे'ने म्हटले आहे.

कर्नाटक मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना प्राप्त ईमेलनुसार, बंगळूरमधील रेस्टॉरंट, मंदिरे, बस किंवा ट्रेन यासारख्या व्यस्त ठिकाणी स्फोट होऊ शकतो. ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तिने सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान बॉम्ब स्फोटाचा इशाराही दिला आहे. याव्यतिरिक्त, ईमेलमध्ये असेही म्हटले आहे की, "स्फोट घडवून आणण्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारांनी 2.5 दशलक्ष डॉलर्स (20 कोटींहून अधिक) खंडणीची मागणी केली आहे, असेही वृत्तात म्हटले आहे.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT