Congress Vs BJP | ‘पाकिस्‍तान जिंदाबाद’च्‍या घोषणा केवळ मतांसाठी; कर्नाटक भाजपचा काॅंग्रेसवर निशाणा | पुढारी

Congress Vs BJP | 'पाकिस्‍तान जिंदाबाद'च्‍या घोषणा केवळ मतांसाठी; कर्नाटक भाजपचा काॅंग्रेसवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांच्या ‘पाकिस्तान भाजपचा शत्रू आहे पण आमचा नाही..’ या विधानाचा निषेध नोंदवत भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते अरविंद बेलाड यांनी या वक्तव्यावरुन बीके हरिप्रसाद यांच्यावर निशाणा साधत म्हटलं आहे, “केवळ मतांसाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते.” (Congress Vs BJP)

Congress Vs BJP : केवळ मतांसाठी….

बीके हरिप्रसाद यांच्या ‘पाकिस्तान भाजपचा शत्रू आहे पण आमचा नाही…’ या विधानाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी आज (दि.२९) बोलताना कर्नाटकमधील भाजप नेते अरविंद बेलाड म्हणाले, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांनी असे म्हणणे हे अत्यंत दुःखद आहे आणि दुर्दैव आहे. पाकिस्तानने  भारतीयांचे काय केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येते. अल्पसंख्याक आणि मुस्लिमांना खूश करण्यासाठी, केवळ मतांसाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते. “

काय म्हणाले होते बीके हरिप्रसाद?

कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांचे ‘पाकिस्तान भाजपचा शत्रू आहे पण आमचा नाही…’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, “पाकिस्तान भाजपसाठी शत्रू राष्ट्र असू शकतो. पण काँग्रेस याकडे फक्त शेजारी देश म्हणून पाहते. भाजपच्या मते पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र आहे. पण आमच्यासाठी पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र नाही. हा आपला शेजारी देश आहे. अलीकडेच त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिला. अडवाणी यांनी लाहोरमध्ये जिना यांच्या कबरीला भेट दिली होती आणि त्यांच्यासारखे धर्मनिरपेक्ष राष्ट्र नाही असे सांगितले होते. तेव्हा पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र नव्हते का? भाजपने या वक्तव्यावर देशविरोधी भावना भडकावल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्‍तान जिंदाबादच्‍या घोषणा?

कर्नाटक राज्‍यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. यानंतर कर्नाटक विधानसभेत काँग्रेस समर्थकांकडून पाकिस्‍तान जिंदाबादच्‍या घोषणा देण्‍यात आल्‍या, असा दावा भाजपने केला आहे. या प्रकरणी पोलिसात बुधवारी (दि.२८) तक्रारही दाखल झाली आहे. दरम्‍यान, या प्रकरणी काँग्रेसचे राज्‍यसभा खासदार नसीर हुसैन यांनी एक व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान आज (दि.२९) कर्नाटक भाजपच्या आमदारांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्याने विधानसभेमध्ये गोंधळ उडाला. एलओपी आर अशोक यांनी घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली आहे.

 

हेही वाचा 

Back to top button