Latest

Karan Mehra Allegations : अभिनेता करण मेहराचे पत्‍नी निशा रावलवर गंभीर आरोप

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा याने (Karan Mehra Allegations) पत्नी निशा रावल हिच्‍यावर गंभीर आराेप केले आहेत. ते ऐकून कुणालाही धक्का बसू शकतो. करण म्हणाला की, "त्याने नाते वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते;  पण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत राहत आहे.

Karan Mehra Allegations : करणने पत्नीवर लावले गंभीर आरोप

गेल्या वर्षी करण मेहरा आणि निशा रावल यांच्या रिलेशनशीपने खूप चर्चा झाली होती. निशाने करणवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. ज्यामुळे अभिनेता करणला तुरुंगाची हवा खावी लागली होती. आता करण मेहराने एका मुलाखतीत आपण आपली लढाई स्वत: लढण्याचे सांगितले आहे. त्याने पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्‍याचा आराेप केला आहे.

अभिनेता म्हणाला, 'मी सर्वकाही विसरून निशाला माझ्या घरी परत येण्यास सांगितले. आम्ही पुन्हा आमच्या नात्याला दुसरी संधी देण्याचा प्रयत्न केला; पण आता कळले आहे की, मी गेल्यानंतर ११ महिन्यांपासून माझ्या घरात एक पुरुष राहत आहे. पत्नी आणि मुलांना सोडून तो माझ्या घरी राहतो.

'लॉक अप'मध्ये अफेअरची कबुली

घटस्फोटाच्या वृत्तादरम्यान, निशा रावल कंगना राणावतच्या 'लॉक अप' शोमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान तिने एक मोठा खुलासा केला. तिने सांगितले होते की, विवाहित असूनही दुसऱ्यासोबत अफेअर होते, तो त्याचा चांगला मित्र होता. हे सांगताना निशाही भावूक झाली होती. करण मेहराला याची माहिती होती, असेही निशाने सांगितले होते.

करण मेहराने निशा रावलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण मेहरा म्हणाला, सगळं ऐकून घेतल्यानंतर मी तिला घरात येऊ दिलं. आम्ही नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. आता कळलं की मी गेल्यानंतर ११ महिन्यांपासून घरात एक वेगळा पुरुष राहतोय. पत्नी आणि मुलांना सोडून तो माझ्या घरात आला आहे. सर्वांना माहित आहे आणि आता मी माझी लढाई लढणार आहे.

निशाला पाठिंबा देणार्‍या तीन मित्रांवर बदनामीचा खटला

करण मेहरा पुढे म्हणाला, 'मी  तिने मला दिलेला धोका सिद्ध करेन. तिने माझ्‍या मुलाला माझ्यापासून वेगळे केले.  माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीवर चिखलफेक झाली. आता मी गप्प बसणार नाही. गेल्या एका वर्षात मला भयंकर वेदना होत आहेत, आता नाही.'निशाला पाठिंबा देणाऱ्या त्याच्या तीन मित्रांवर बदनामीचा खटला केल्याचा खुलासाही करणने केला आहे. करणच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल उचलणे गरजेचे होते, कारण जेव्हा निशा काही चुकीचे करत होती तेव्हा तिच्या मित्रांनीही तिला पाठिंबा देणे चुकीचे हाेते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT