Latest

Kapnya Recipe : दिवाळीच्या खुसखुशीत कापण्या कशा कराल? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या (Kapnya Recipe), शेव, अनारसे, बाकरवडी, मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास 'दिवाळीच्या कापण्यांची' रेसिपी पाहूया…

साहित्य

१) तीनशे ग्रॅम गव्हाचे पीठ

२) एक कप पाणी

३) दीडशे ग्रॅम गूळ

४) एक चमचा सुंठ पावडर

५) एक चमचा वेलची पावडर

६) दोन चमचे तेलाचे मोहन

७) आणि शेवटी तळण्यासाठी तेल

कृती 

१) पहिल्यांदा गॅसवर एका भांड्यात १ कप पाणी घेऊन सर्व गूळ वितळून घ्या. गूळ वितळल्यानंतर ते पाणी थंड करून घ्या.

२) नंतर परातीत २ कप गव्हाचे पीठ घेऊन, त्यात चवीनुसार मीठ घाला. २ चमचे बेसन, सुंठ पावडर आणि वेलची पावडर घाला.

३) गॅसवर कढई ठेवून त्यात २ चमचे तेल टाकून कडकडीत गरम करून घ्या. हेच तेलाचे मोहन पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

४) त्यानंतर या पिठामध्ये गुळाचे पाणी घालून घाला आणि व्यवस्थित मळून घ्या. मळलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवा. नंतर गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा.

५) अर्ध्या तासानंतर पिठाचे एकसारख्या आकाराचे जाड पोळीच्या हिशोबाने छोटे-छोटे गोळे करून घ्या. नंतर पोळपाटावर एक-एक गोळा घेऊन चपातीसारखं लाटा.

६) पोळपाटावर त्याची जाडसर पोळी झाली की, चिरणं घेऊन शंकरपाळीसारख्या आकाराची पोळी चिरून घ्या आणि सर्व कापणीचे सर्व तुडके एका पेपरमध्ये काढून घ्या.

७) कापणीचे तुकडे गरम तेलामध्ये सोडून तपकिरी रंग येईपर्यंत झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित तळून घ्या. तळून झाल्यानंतर खुसखुशीत कापण्या (Kapnya Recipe) तयार झाल्या आहेत. थंड झाल्या की, त्या डब्यात भरून ठेवा.

पहा व्हिडिओ : खुसखुशीत खमंग चकली रेसिपी आणि टिप्स

या रेसिपी वाचल्यात का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT