पुढारी ऑनलाईन डेस्क : लाल सिंह चड्ढा चित्रपट बायकॉट करण्याच्या मागणीनंतर आता अक्षय कुमार आणि लेखिका कनिका ढिल्लन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. त्याचबरोबर, चित्रपट रक्षा बंधनलादेखील ट्रोल केलं जात आहे. कारण, नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, कनिका ढिल्लनने (Kanika Dhillon) हिंदू संस्कृतीविरोधात अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केले आहेत. (Kanika Dhillon)
आमिर खानचा चित्रपट लाल सिंह चड्ढाचा वाद अद्याप संपलेला नाही. नेटकरी बायकॉट लाल सिंह चड्ढा असा ट्रेंड सोशल मीडियावर करत आहेत. दरम्यान, खिलाडी कुमार अक्षय कुमारचा रक्षा बंधन चित्रपटदेखील ट्रोल होत आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होतोय. रक्षा बंधनची लेखिका कनिका ढिल्लनचे जुने ट्विट्स व्हायरल होत आहेत. त्यावरून कनिकालादेखील ट्रोल केलं जात आहे.
रक्षा बंधन ची लेखिका कनिकाच्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट शेअर करून नेटकरी हा चित्रपट बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे #BoycottRakshaBandhanMovie ट्विटरवर ट्रेंड होत होतं. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, कनिका ढिल्लनने हिंदू संस्कृती विरोधात वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, कनिकाने कधी मोदी सरकारवर निशाणा धरला तर कधी बीजेपीला टार्गेट केलं आहे. हिंदु बांधवांच्या धार्मिक भावना दुखावलं आहे. गौमूत्रवरदेखील तिने वादग्रस्त कमेंट केलं होतं.
नेटकऱ्यांनी कनिकाला धारेवर धरलं आहे. तिने कनिकाने गोमातेची आपल्या ट्विट्समध्ये अनेकदा चेष्टा केली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कनिका प्रसिध्द लेखिका आणि स्क्रीनरायटर आहे. दरम्यान, अक्षय कुमारच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्यावरून अक्षयला ट्रोल केले जात आहे.
चित्रपट रक्षा बंधनचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना राणौतनेदेखील 'या' चित्रपटावरून ताशेरे ओढले आहेत.