पुणे : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराच मृत्यू | पुढारी

पुणे : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराच मृत्यू

पुणे, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगातील डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरत आण्णा देवकर (वय.41,रा. वडार वस्ती भाजी मंडई येरवडा) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी डंपर चालक रोहिदास राजाराम गोरे (वय.30,रा. लोहगाव) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी सिमा वळवी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास गेरा रोड खराडी परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर हे एका खासगी कंपनीत काम करत होते. मंगळवारी दुपारी ते दुचाकीवरून गेरा रोड खराडी परिसरातून निघाले होते. त्यावेेळी भरधाव वेगातील एका डंपरने त्यांना धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी ह्या त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांसोबत हद्दीत गस्तीवर होत्या. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ डंपर चालक गोरे याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोनावणे करीत आहेत.

Back to top button