Latest

हिमाचलमध्ये भाजप च्या उमेदवारांच्या यादीत कंगना राणावत हिचं नावचं नाही; ती यादी फेक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. ट्विटरने तिला नियमांच उल्लंघन केल्याच्या कारणाने बॅन केलं आहे. पण ट्विटरवरच कंगनावरुन गुरुवारी ७ ऑक्टोबर रोजी एक बातमी व्हायरल झाली. कंगना राणावतला मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप ने उमेदवारी दिल्याची बातमी होती. सोशल मीडियावर याविषयी पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. ट्विटरवर अनेकांनी हे शेअर केले. पण काही वेळानंतर कळाले की, प्रकरण काहतरी वेगळच आहे.

उमेदवारांची यादी व्हायरल

मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणावत ला भाजप चे तिकीट मिळाल्याची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ७ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत भाजपकडून कोणतीही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नाही. पण ही यादी अनेकांनी खरी मानली. अभिनेत्री कंगना राणावत नावाबरोबरच इतर उमेदवारांची नावेही यात लिहिली होती, त्यावर शिक्केही लावण्यात आले होते, त्यांच्यावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या होत्या. लोकांनी ही यादी व्हायरल केली.

खऱ्या यादीत नावच नाही

दरम्यान थोड्यावेळाने उमेदवारांची खरी यादी आली. त्या यादीत भाजपने मंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर कंगना राणावतला उमेदवारी दिलेली नाही. कारगिल हिरो ब्रिगेडियर खुशाल ठाकूर यांचे नाव भाजपने मंडी संसदीय जागेवर घोषित केले आहे.

एवढेच नाही तर भाजप हिमाचल प्रदेशच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये मंडी सीटवरून फक्त खुशाल ठाकूरचे नाव दिसत आहे.

हिमाचल प्रदेश भाजपचे मीडिया सह-प्रभारी करण नंदा म्हणाले की, पक्षाने उमेदवारांच्या बनावट यादीची दखल घेतली आहे. तिकीट वाटपाशी संबंधित बनावट यादी व्हायरल करणाऱ्या आणि अपप्रचार पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भाजपच्या लीगल सेलच्या वतीने सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

कंगना राणावत मंडी जिल्ह्यातील भांबला गावची रहिवासी आहे. तिचे नवे घर मनाली येथे बांधले आहे, जे मंडी लोकसभा मतदारसंघात येते. मंडी व्यतिरिक्त, हिमाचलमधील फतेहपूर, जुबल कोथकाई आणि आर्की विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर आर्कीची जागा रिक्त आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT