Latest

Kajal Aggarwal : प्रेग्रेंसीमुळे काजल नागार्जुनच्या चित्रपटातून बाहेर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार काजल अगरवाल (Kajal Aggarwal) प्रेग्रेंट असल्याच्या माध्यमांमधून चर्चा रंगू लागल्या आहेत. नागार्जुनच्या आगामी चित्रपटात काजल होती. मात्र, तिला प्रेग्नेंट असल्यामुळे रिप्लेस करण्यात आलं आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेले आहेत, तिच्या फोटोमधील ग्लोवरून चाहते ती प्रेग्रेंट झाल्याच्या तर्क लावत आहेत.

मीडियाच्या माध्यमातून चर्चा अशा होत आहे की, काजल (Kajal Aggarwal) ही प्रेग्रेंट आहे. त्यामुळे ती आगामी चित्रपटातून बाहेर पडत आहे. पण, लग्नापूर्वी काजलने असं स्पष्ट केलं होतं की, लग्नानंतर अभिनयाला राम राम ठोकणार नाही, तर पुन्हा नव्या जोमाने काम करणार आहे.

पण, ती प्रेग्रेंट राहिल्यामुळे तिला प्रसिद्ध सुपरस्टार नागार्जुनच्या आगामी चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले आहेत. त्यामुळे काजलच्या प्रेग्रेंटवरून मनोरंजन विश्वात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. काजलच्या लग्नाला अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही, तरीही ही ती प्रेग्रेंट असलेल्या चर्चेवरून तर्कवितर्क मांडले जात आहे.

असं असलं तरी, या दरम्यान काजल आपल्या सोशल मीडियावरून विविध पोजचे फोटो अपलोड करत चाहत्यांना खूश करत आहे. तिने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले आहेत. त्या फोटोमधील काजलच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. त्यामुळे चाहते काजल प्रेग्रेंट असल्याचा तर्क लावत आहेत.

काजलने बाॅलिवूडमधील करिअरची सुरुवात 'क्यों हो गया ना' या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर 'सिंघम' या चित्रपटांमध्ये प्रक्षेकांसमोर आली, त्यामध्ये अभिनेता अजय देवगण याच्यासोबत अभिनय करताना दिसली.

'स्पेशल-२६' या चित्रपटात अक्षय कुमार आणि 'दो लफ्जों की कहानी'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. दाक्षिणात्य चित्रपटांमधून काजल यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.  तिच्या गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या यादीमध्ये 'मुंबई सागा', 'आचार्य', 'मोसागल्लू', 'ये सिनामिका'. 'पॅरिस पॅरिस' आणि सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांच्या 'इंडियन-२' या चित्रपट आहेत.

पहा व्हिडीओ : बाळंतपणानंतर घ्यायची काळजी व वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT