पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बीआरएसच्या के. कविता यांना काल (दि.१५) ईडीने हैद्राबाद (तेलंगणा) येथून अटक केली. त्यानंतर त्यांना आज (दि.१६) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान के.कविता यांना 'माझी अटक बेकायदेशीर' अशी प्रतिक्रिया दिली आहे. (K Kavitha Arrested)
के कविता यांना ईडीने अटक करून काल दिल्लीत आणले. यानंतर त्यांना आज (दि.१६) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले. त्यांना विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात के. कविता यांची आणखी चौकशी केली जाणर आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (K Kavitha Arrested)
"ही अटक म्हणजे सत्तेचा उघड गैरवापर आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे ज्याने आम्हाला संरक्षण दिले आहे," बीआरएस एमएलसी के कविता यांचे वकील विक्रम चौधरी यांनी त्यांचे मत दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयातमांडले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.ईडीने 21 फेब्रुवारी रोजी के कविता यांना समन्स बजावून 26 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ईडीने कारवाई करत कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर छापा टाकला. यादरम्यान, काही तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर कविता यांना ताब्यात घेतले.
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की 'साउथ ग्रुप' नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत 'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती.
आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही उत्पादन शुल्क धोरणाबाबत ईडी सातत्याने समन्स पाठवत आहे. मात्र, ईडीकडून समन्स आल्यानंतरही सीएम केजरीवाल एकदाही चौकशीसाठी गेलेले नाहीत. त्यांनी ईडीचे समन्स बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा: