Latest

Manoj Jarange : जरांगे यांची उद्या जामखेडला महासभा

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर दि 6 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार आहे. तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील दि. 6 रोजी दुपारी दोन वाजता खर्डामार्गे जामखेडला येणार आहेत. त्यामुळे खर्डा येथील मराठा बांधवांतर्फे त्यांचे खर्डा बसस्थानक परिसरात सहा जेसीबींच्या माध्यमातून फुलांची उधळण करत मोठा पुष्पहार घालून सत्कार करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : 

सभेपूर्वी जरांगे चौंडी येथे जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्तंभाचे दर्शन घेऊन जामखेड येथे सभास्थळी येणार आहेत. कालच्या नियोजन बैठकीत सभेला मोठी गर्दी होणार असल्याने वाहनांच्या पार्किंगबाबत चर्चा झाली. दरम्यान, सभेस दोन्ही आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात आले असले तरी एकही राजकीय भाषण त्या ठिकाणी होणार नाही, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

SCROLL FOR NEXT