Latest

जळगाव : ३१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, एकनाथ खडसेंचा भाजपला धक्का

backup backup

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

भुसावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह वीस नगरसेवक तसेच सावदा येथील नगराध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांनी नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भुसावळ सावदा पळसपुर या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भुसावळ नगरपरिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण गोडे यांनी आज नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर या सोबत भाजपच्या वीस नगरसेवकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं भुसावळ मध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे.
त्याचबरोबर सावदा येथील नगराध्यक्ष अनीता येवले, फैजपूर येथील नगरसेवक, जामनेर येथील कार्यकर्ते यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपला मोठा धक्का दिला.

यावेळी एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, सतीश अण्णा पाटील, गुलाबराव देवकर, अरुणभाई गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT