Latest

जळगाव : पाच महिन्याचे मृत अर्भक आढळल्याने उडाली खळबळ

गणेश सोनवणे

जळगाव : प्रतिनिधी : एरोडल तालुक्यातील आडगाव येथील एका प्लॉटच्या परिसरात पाच महिन्याचे मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेवर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील एका प्लॉटच्या परिसरात गर्भातील अंदाजे ५ महिन्याचे अर्भकाला अज्ञात महिलेने फेकून दिले होते. या परिसरात राहणारे लहान मुले खेळत असतांना हा प्रकार लक्षात आला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील पोलीस पाटील नितीन भुसारी यांनी घटनेची माहिती घेतली.

पोलीस पाटील भुसारी यांनी कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निता काटे यांना घटनेची माहिती दिली. कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, गर्भातील साधारण पाच महिन्याचे अर्भक असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी पंचनामा केला. पोलीस पाटील नितीन भुसारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT