यावल तालुक्यातील आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार | पुढारी

यावल तालुक्यातील आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

जळगाव : प्रतिनिधी : यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या आठ वर्षीय मुलावर एकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ८ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी किरण संतोष तायडे रा. तालुका यावल याने शेतात हरभरा खाण्याचा बहाणा करून शेतात नेले. त्या ठिकाणी निर्जळ ठिकाणी नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलावर अत्याचार करून संशयित आरोपीने कुणाला सांगू नको असा दम दिला. याप्रकरणी मुलाच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण तायडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मोहन लोखंडे करीत आहे.

Back to top button