Latest

Israel-Hamas War Updates: तीन तासात गाझा शहर खाली करा ; इस्रायल सैन्याचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीत युद्ध पेटण्याचे संकेत मिळत आहेत. इस्रायल सैन्य देखील गाझामध्ये जमिनीवरील युद्धारंभाला सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर गाझामध्ये असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना इस्रायलकडून पुढील ३ तासात गाझा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायल सैन्याने गाझातील रहिवाशांना तीन तासांत उत्तर गाझा येथून दक्षिण गाझाकडे जाण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सने दिली आहे. (Israel-Hamas War Updates)

संबंधित बातम्या:

दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबरला इस्‍त्रायलवर भीषण रॉकेट हल्ला केला. यानंतर इस्रायलने देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले. हमास आणि इस्रायल यांच्यात हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवर युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान हमासविरोधी हल्ल्यानंतर जमिनीवरील आरपारच्‍या लढाईसाठी आता इस्रायल सज्‍ज झाल्याचे, इस्रायल डिफेन्स फोर्सने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Israel-Hamas War Updates)

Israel-Hamas War Updates: आता अंतिम आदेशाची प्रतीक्षा

इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) घोषणा केली आहे की, ते गाझावर जमीन, हवाई आणि समुद्राद्वारे हल्ल्यासाठी सज्ज आहेत. गाझा सीमेवर इस्रायल सैन्याने मोठ्या संख्येने आपले जवान तैनात केले आहेत आणि अंतिम आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत, असे देखील डिफेन्स फोर्सने म्हटले आहे. (Israel hamas war news latest)

२००६ नंतर सर्वात मोठे ग्राउंड ऑपरेशन; इस्रायल डिफेन्स फोर्स

इस्रायलने पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीत जमिनीवर हल्ला करून गाझा शहर घेण्याचे तसेच हमास दहशतवादी नेत्यांचा खात्‍मा करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवले आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. इस्रायल गाझातील जमिन, हवाई आणि सागरी हल्ल्यासाठी तयार आहे. इस्रायलच्या या हल्ल्याचा उद्देश हमासच्या नेतृत्वाचा नायनाट करणे, ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना सोडणे आणि गाझा ताब्यात घेणे हे देखील महत्त्वाचे उद्देश आहेत. तसेच २००६ नंतर इस्रायलचे हे सर्वात मोठे ग्राउंड ऑपरेशन असेल, असेही इस्रायल डिफेन्स फोर्सने स्पष्ट केले आहे.

संपूर्ण देशात इस्रायली सैन्य तैनात

इस्रायल डिफेन्स फोर्सच्या एका वरिष्ठ अधिकारी जोनाथन कॉनरिकस यांनी म्हटले आहे की, आमचे सैन्य गाझा पट्टीत लढाऊ कारवाया तीव्र करण्यास सज्ज आहेत. संपूर्ण देशात इस्रायली सैन्य तैनात करण्यात आले आहे. गाझा पट्टीत युद्धाच्या पुढील टप्प्यांसाठी कारवाईची तयारी वाढवली जात आहे. यामध्ये जमिनीवरील युद्ध कारवाईवर अधिक भर दिला जाणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांने सांगितले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT