Latest

Israel-hamas war Update: ‘ऑपरेशन अजय’- १८ हजार भारतीय सुरक्षित; २३० परतीच्या मार्गावर; परराष्ट्र मंत्रालय

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दहशतवादी संघटना 'हमास'ने इस्राईलवर शनिवारी (दि.७) अचानक हवाई हल्ले केला. यामध्ये आतापर्यंत ३ हजार नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो जखमी झाले, तर हमास दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकांना ओलिस ठेवले आहे. हमास आणि इस्रायलच्या संघर्षात काही भारतीय देखील अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी भारताकडून 'ऑपरेशन अजय' राबवले जात आहे. दरम्यान इस्रायलमधून २३० भारतीयांना घेऊन, पहिली तुकडी लवकरच भारतात रवाना होणार असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रायलाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. ते आज (दि.१२) माध्यमांशी बोलत होते. (Israel-hamas war Update)

Israel-hamas war Update: २३० भारतीय इस्रायमधून उद्यापर्यंत परतणार

अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत येण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना घेण्यासाठी पहिले चार्टर विमान आज रात्री उशिरा इस्रायमधील तेल अवीवला पोहोचेल. उद्या हे भारताचे पहिले चार्टर विमान सकाळी भारतात परतण्याची शक्यता आहे. यात 230 भारतीय इस्रायमधून प्रवास करतील अशी अपेक्षा आह, असेही ते म्हणाले. (Israel-hamas war Update)

इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय अडकले

हमास आणि इस्राय,ल संघर्षात आतापर्यंत इस्रायली नागरिकांसोबत अनेक परदेशी नागरिक देखील मारले गेले. या ठिकाणचा संघर्ष अद्याप थांबलेला नाही. परंतु या युद्धजन्य संघर्षात आतापर्यंत एकाही भारतीयाचा मृत्यू झालेला नाही. अजून १८ हजार भारतीय इस्रायलमध्ये अडकले आहेत. मिशन अजय अंतर्गत हळूहळू सर्व भारतीयांना सुरक्षितकपणे भारतात आणले जाईल. यासाठी इस्रायमधील भारतीयांनी अजय मिशनअंतर्गत जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देखील परराष्ट्र मंत्रायलाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिला आहे. (Israel-hamas war Update)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT