Latest

Israel-Hamas war | इस्रायलकडून ‘हमास’ हवाई दलाच्या म्होरक्याचा खात्मा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हवाई रॉकेट हल्ला करत, संघर्षाला सुरूवात केली. हमासच्या या महाभयंकर हल्ल्याला इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान काल संध्याकाळी इस्रायलकडून करण्यात आलेल्या कारवाईत 'हमास' दहशतवादी संघटनेच्या हवाई दलाचा प्रमुख मारला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Israel-Hamas war)

संबंधित बातम्या:

'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्या वृत्तानुसार, गाझा पट्टीमध्ये इस्रायल सैन्याने रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात हमास दहशतवादी गटाच्या एका वरिष्ठ सदस्याचा खात्मा केल्याचे इस्रायल संरक्षण दलाचे म्हटले आहे. इस्रायल संरक्षण दलाच्या म्हणण्यानुसार, ज्या मुख्यालयातून हमास दहशतवादी गटाने त्याच्या हवाई हालचालींचे व्यवस्थापन केले. त्या मुख्यालयाला इस्रालयने लक्ष्य करत हल्ला केला. यामध्ये  हमासच्या हवाई दलाचा प्रमुख 'मुराद अबू मुराद' हा मारला गेला,असे देखील  संरक्षण दलाने म्हटले आहे. (Israel-Hamas war)

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये 'हमास' हवाई दलाचा प्रमुख अबू मुरादचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. इस्रायली नागरिकांच्या हत्यांमागे 'हमास' दहशतवाद्यांना निर्देशित करण्यात त्याचा मोठा सहभाग होता. हमासने केलेल्या हवाई हल्ल्यातील 'हँग ग्लायडर' हवेतून इस्रायलमध्ये डागण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. असे देखील 'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Israel-Hamas war)

इस्रायल – हमास संघर्षात ७ दिवसांत ३२०० लोकांचा बळी

इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात आतापर्यंत ३२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्रायलमधील १३०० आणि गाझामधील १९०० नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान इस्रायलने उत्तर गाझातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निघून झाल्याचा इशारा दिल्यानंतर हजारो नागरिक दक्षिण गाझाकडे निघून जात आहेत.

११ लाख लोकांना २४ तासात हलवणे हे 'मानवी संकट': UN

इस्रायलच्या लष्कराने गाझामध्ये शुक्रवारी छापे टाकले, पण प्रत्यक्षात जमिनीवरील कारवाईबद्दल इस्रालयच्या लष्कराने खुलासा केलेला नाही. तर हमासने इस्राईलमधून दक्षिण गाझाकडे जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर हल्ले केल्याने ७० लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान मध्य-पूर्वेतील जॉर्डन, बहरीन या देशांत इस्रायलच्या गाझातील कारवाई विरोधात मोठी निदर्शने झाली, यात हजारो मुस्लिमांनी भाग घेतला. ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे. तर युरोपियन युनियनचे परराष्ट्र विभागाचे प्रमुख जोसप बोरेल यांनी फक्त २४ तासांत उत्तर गाझातील ११ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवणे अशक्य असल्याचे सांगितले. "कल्पना करा आपण ११ लाख लोकांना चोवीस तासात दुसऱ्या ठिकाणी जायला सांगत आहतो. हे मानवी संकट आहे. असे बीबीसीने  दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT