Latest

Israel-Hamas war | इजिप्त गाझाच्या मदतीसाठी सीमा खुली करणार, पण इस्रायलचा इशारा…

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी गाझामध्ये २० ट्रक मदत पोहोचवण्यासाठी सीमा खुली करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेनेही गाझात मदत पोहोचवण्यास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यात बुधवारी गाझामध्ये २० ट्रकमधून मदत पोहोचवण्यासाठी सहमती झाली. दरम्यान, जो बायडेन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पण ही मदत शुक्रवारपर्यंत पोहोचवणे अशक्य आहे. त्यांनी यावेळी रस्ते दुरुस्तीचे कारण सांगितले.

संबंधित बातम्या

इजिप्तने मानवतावादी मदतीसाठी रफाह सीमा खुली करण्याचे मान्य केले आहे. पण इस्रायलचे म्हणणे आहे की जोपर्यंत हमास सर्व ओलिसांना सोडत नाही तोपर्यंत ते आपल्या प्रदेशातून पुरवठा करण्यास परवानगी देणार नाहीत.

दरम्यान, रफाह सीमा मार्गे नागरिकांना गाझा सोडण्याची परवानगी दिल्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. या शक्यतेबद्दल पत्रकारांनी विचारले असता, बायडेन म्हणाले, "आम्ही लोकांना बाहेर काढणार आहोत, पण मी आता कोणताही अधिक तपशील देऊ शकणार नाही."

इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यान रफाह बॉर्डर क्रॉसिंग अथवा रफाह क्रॉसिंग पॉइंट हा एकमेव क्रॉसिंग पॉइंट आहे. हे ठिकाण गाझा-इजिप्त सीमेवर स्थित आहे, ज्याला १९७९ च्या इजिप्त-इस्रायल शांतता कराराद्वारे मान्यता देण्यात आली होती.

पॅलेस्टिनी नागरिक आश्रय घेत असलेल्या रुग्णालयात गर्दीच्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटात ४७१ लोकांचा मृत्यू झाला आहे, असे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल बुधवारी इस्रायलला भेट दिली आणि त्यांनी गाझा येथील रुग्णालयात झालेल्या स्फोटात इस्रायलचा सहभाग नसल्याचा सूर व्यक्त केला.

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने हल्ले सुरु केले होते. त्याला इस्रायलने चोख प्रत्युत्तर देत गाझा पट्टीवर जोरदार हल्ले केले. त्यात गाझा उद्ध्वस्त झाले आहे. या संघर्षात आतापर्यंत सुमारे १,४०० इस्रायली आणि सुमारे ३,५०० पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT