Latest

“राम मंदिर हा खरा मुद्दा आहे का? महागाई, रोजगारावर बोला…”: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राममंदिर हा खरा मुद्दा आहे का? की, महागाई आणि बेरोजगारी खरे मुद्दे आहेत, असा सवाल करत रोजगार, महागाई आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांसमोरील असणार्‍या आव्हानांबद्दल बोला. खरे मुद्दे काय आहेत ते देशातील जनतेला ठरवावे लागेल, असे मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्‍यक्‍त केले. 'एएनआय'ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये त्‍यांनी पुन्‍हा एकदा राम मंदिरावर भाष्‍य केले. (Sam Pitroda on Ram Mandir)

Sam Pitroda on Ram Mandir : धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवा

या वेळी सॅम पित्रोदा म्‍हणाले की, मला कोणत्याही धर्माबद्दल काही अडचण नाही. मंदिरात एकदा तरी जायला हरकत नाही, पण तुम्ही ते मुख्य व्यासपीठ बनवू शकत नाही. ४० टक्के लोक भाजपला मत देतात, तर ६० टक्के लोकांनी भाजपला मत देऊ नका. पंतप्रधान हा देशाचा असोत पक्षाचा असत नाही, हाच संदेश भारतातील जनतेला हवा आहे. तुमच्या धर्माचे पालन करा पण धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवा," असे अध्यक्ष पित्रोदा यांनीही जोर दिला.

Sam Pitroda on Ram Mandir : २०२४ची निवडणूक राष्‍ट्राचे भवितव्‍य ठरवेल

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) ला गंभीरपणे घ्‍यावे, असे आवाहन मी माझ्या पक्षाला आणि आघाडीच्‍या सदस्यांना करतो. हा काही साधा मुद्दा नाही. याकडे दुर्लक्ष करू नका कारण २०२४ ची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवेल. भारत कोणत्या मार्गावर जात आहे ते ठरवेल. भविष्यात घ्या. आज लोकशाहीचा ऱ्हास होत असल्याचे मला दिसत आहे. देशाचे पंतप्रधान १० वर्षांहून अधिक काळ पत्रकार परिषद घेत नाहीत. पंतप्रधान मंदिरात जास्त वेळ देतात, याचा मला त्रास होतो," असेही ते म्हणाले.

निवडणूक एका कल्‍पनेवर लढली पाहिजे

भाजपविरोधी इंडिया आघाडीच्‍या पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? या प्रश्‍नाला उत्तर देताना सॅम पित्रोदा म्‍हणाले की, निवडणूक कोणत्याही चेहऱ्यावर किंवा व्यक्तिमत्त्वावर नव्हे तर एका कल्पनेवर लढली पाहिजे. देशाच्‍या राज्‍यघटनेचे रक्षण कोण करेल? लोकशाही कोण वाढवेल? कोण रोजगार देईल, तुमच्या आरोग्याची आणि पायाभूत सुविधांची काळजी घेईल? ही राष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही. ही संसदीय निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही चेहरा असण्याची गरज नाही पण कल्पना असायला हवी, असेही ते म्‍हणाले.

राहुल गांधी पक्षाचे नेतृत्‍व करण्‍यास पात्र

राहुल गांधी हे बुद्धिमान व्यक्ती असून ते काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यास पात्र आहेत. विदेशात आम्‍ही भारतावर टीका करत नाही, तर भारत सरकारवर टीका करतो. या दोन भिन्न गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण करू नका. भारत जगासाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला आमच्या देशाबद्दल जागतिक व्यासपीठावर चर्चा करण्याचा अधिकार आहे," असेही त्‍यांनी सांगितले.
आता जनतेने ठरवायचे

हिंदू राष्ट्र बनवायचे आहे की विविधता, रोजगार यावर लक्ष केंद्रित करून खरोखर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायचे आहे, याचा विचार देशातील जनतेला विचार करावा लागेल, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT