Latest

‘पुष्पा’ भारी आहे की नाही ? या वादात पडू नका, आजच हे ५ साऊथ सुपरहिट चित्रपट पाहून घ्या !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क 

गेल्या काही काळात दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. यातील मोठा प्रेक्षकवर्ग हिंदीमध्ये डबींग केलेल्या कॉमेडी आणि ॲक्शन चित्रपटांना टिव्हीवर पाहत वाढला. आता ओटीटी प्लॅटफार्मचा आधार घेत या सिनेमांच वलय वाढत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमधील अनेक सिनेमे, छोट्या छोट्या सिनेमांमधील चेहेरे जे समोर येऊ शकत नव्हते. त्यांना आता उत्तर भारतातही पसंती मिळत आहे. काही काळापुर्वी 'पुष्पा द राइज' हिंदी मध्ये प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती मिळत आहे.

आम्ही अशाच काही 'कथित' छोट्या सिनेमांच्या स्वरुपात आलेल्या पण ज्यांची चर्चा झाली नाही. अशा चित्रपटांबद्दल तुम्हाला खाली माहिती देत आहोत.

१. सिताराम बिनॉय : केस नं १८

कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटात एका पोलिसाची कहाणी आहे ज्याचे नुकतेच गावात ट्रान्सफर झालेलं आहे. तो गावात आल्यानंतर त्याला समजते की गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे. गावात आल्यानंतर त्याच्या स्वत:च्या घरातही चोरी होते. आणि हे प्रकरण वैयक्तिक पातळीवर जाते. या चोरांच्या प्रकरणांचा आरोपी शोधण्यासाठी रात्रंदिवस एक करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते यामध्ये काही लोकांच्या हत्या देखील झालेल्या आहेत. यानंतर पूर्ण सिनेमा चोऱ्यांसोबत खुन्यांना शोधण्यात जातो. सितारामच्या रोलमध्ये विजय राघवेंद्र आहेत. त्यांचा हा ५० वा चित्रपट आहे.

२. हिट द फर्स्ट केस

हा सिनेमा तेलुगू भाषेतील आहे. हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाचा केंद्रबिंदू गुन्हा चौकशी विभागाचा विक्रम हा आहे. विक्रम तल्लख बुद्धीचा आहे आणि गुन्ह्याचा तपास करण्यात त्याचा हात कोणी हात धरु शकत नाही. पण तो मानसिक अस्वस्थेतून जात आहे ज्याची पार्श्वभूमी एका घटनेत आहे.

३. एक – अयप्पनम कोशियम

हा सिनेमा २०२० मध्ये मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची स्टोरी मजेदार आहे. यात दोन लोकांच्या अहंकारांची टक्कर झाली आहे. या दोन लोकांची नावेच या चित्रपटाला दिली आहेत. अयप्पन हा माजी पोलिस अधिकारी आहे. जो माजी भारतीय सैनिकाला दारुबंदी असलेल्या ठिकाणी दारुच्या बाटली हातात असताना पकडतो. प्रकरण गरम झाल्यावर अयप्पन आणि कोशी यांना अनेक कलम लावून जेलमध्ये टाकतो. यातून दोघांमध्ये मोठा संघर्ष होतो. ज्यात अयप्पनची नोकरी जाते आणि दोघे एकमेकांना आयुष्यातून उध्वस्त करण्याची शपथ घेतात.

४. जोसेफ

हा सिनेमा २०१८ साली मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. या सिनेमाचा केद्रबिंदू ही रिटायर्ड पोलिस आहे. या पोलिसाचं नाव जोसेफ आहे. रिटायर्ड झालेल्या जोसेफला तपासासाठी बोलवले जाते. जोसेफ आपल्या दारु आणि आमल्या पदार्थांच्या व्यसनाला बाजूला ठेऊन गुन्हेगारांना पकडतो. जोसेफला त्याची पत्नी सोडून जाते. त्याची पत्नी स्टेला पीटर सोबत दुसरे लग्न करते. या सगळ्यात स्टेलाचा अपघात होतो त्यामध्येच तीचा मृत्यू होतो. तल्लघ बुद्घीचा जोसेफ अपघात झालेल्या ठिकाणी जातो तेव्हा त्याला स्टेला अपघातात नाही तर जाणून-बुजून मारल्यात आल्याचे समजते. येथून जोसेफची कहाणी सुरु होती.

५. कुरुति

२०२१ मध्ये आलेला हा सिनेंमा या यादीतील सगळ्यात तगडा सिनेमा आहे. मल्याळम भाषेत असलेला सिनेमा अनेक दिवस तुमच्या स्मरणात राहिल. मनु वॉरियर ने बनवलेल्या या चित्रपटात सामाजिक संरचना दाखवलेली आहे. तीन पुरुषांच्या एका मुस्लीम कुटुंबात एका रात्री एक पोलिस शिरतो. त्याला एका आरोपीला पकडायचे असते मात्र रात्री थांबण्यासाठी जागा सापडत नाही. पुलिस ज्याला पकडून आणतात तो सांप्रदायिक हिंसेतील आरोपी आहे. त्याने एका मुस्लीम व्यक्तीची हत्या केली आहे. हा सिनेमा या संघर्षाला दाखवतो.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT