Virat : ‘विराट’ला निरोप देताना राष्ट्रपती, पंतप्रधान भावूक! | पुढारी

Virat : 'विराट'ला निरोप देताना राष्ट्रपती, पंतप्रधान भावूक!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रपतींच्या अंगरक्षक ताफ्यात समाविष्ट असलेला ‘विराट’ (virat horse) हा घोडा आज (दि. २६) निवृत्त झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विराटच्या डोक्यावर थोपटून त्याला निरोप दिला. विराट या घोड्याने १० हून अधिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला आहे.

७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘विराट’ पोहोचला तेव्हा पीएम मोदीही त्याला प्रेमाने रोखू शकले नाहीत. पंतप्रधान मोदींनी विराटला प्रेमाने मिठी मारली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विराटला कुरवाळलं. वास्तविक, ‘विराट’ हा एकमेव घोडा आहे जो १३ वेळा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळेच ‘विराट’ची आज दिमाखदार पद्धतीने निवृत्ती झाली.

‘विराट’ची गुणवत्ता आणि सेवा लक्षात घेऊन त्याला अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे. ‘विराट’ राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबात सामील होता आणि त्याला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणूनही ओळखले जात होते. आर्मी डे २०२२ निमित्त ‘विराट’ला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘विराट’ हा राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा पहिला चार्जर आहे ज्याला कॉमंडेशन कार्ड देण्यात आले आहे.

Image

जाणून घेवू कोण होता विराट….

प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या निमित्ताने देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद जेव्हा राजपथावर आले, तेव्हा तुम्ही त्यांच्या अंगरक्षकांना भव्य उंचीच्या घोड्यांवर स्वार झालेले पाहिले असेल. अशाच एका ‘विराट’ घोड्याची (virat horse) गोष्ट सांगणार आहे. ज्याला भारतीय लष्कराकडून राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विशेष सन्मान दिला जातो.

Image

विराटला त्याच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड (COMMENDATION Card) देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे प्राणी आपल्या स्नेह आणि प्रेमास पात्र आहेत, त्याचप्रमाणे ते त्यांचे कर्तव्य आणि शिस्तीच्या पूर्ततेसाठी आदरास पात्र आहेत. विराट नावाच्या घोड्याने ही गोष्ट खरी करून दाखवली.

महाराणा प्रताप यांचा आपल्या चेतक घोड्यावर ज्याप्रमाणे पूर्ण विश्वास होता, त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाई आपला घोडा पवनला विश्वासू मानत होत्या, आजच्या युगात या विराट नावाच्या घोड्यावर सर्वांची श्रद्धा आहे. हा सामान्य घोडा नसून देशाच्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबातील एक महाकाय घोडा आहे, ज्याला राष्ट्रपतींचे अंगरक्षक चार्जर असेही म्हणतात.

विराट (virat horse) २००३ मध्ये हेमपूरच्या रिमाउंट ट्रेनिंग स्कूलमधून राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबात सामील झाला होता. हा होनोव्हेरियन जातीचा घोडा आहे जो त्याच्या नावानुसार अतिशय ज्येष्ठ, शिस्तप्रिय आणि आकर्षक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विराटने जंपिंग टीमचा भाग बनून अनेक विक्रम केले. त्यांची क्षमता आणि उत्कृष्ट गुण पाहून त्यांची कमांडंट चार्जर म्हणून निवड झाली. आत्तापर्यंत रेजिमेंटच्या काही घोड्यांना हा मान मिळाला आहे. विराट गेल्या 13 वर्षांपासून प्रजासत्ताक दिन परेड, बीटिंग द रिट्रीट सेरेमनी आणि विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागत समारंभात चार्जरच्या रुपात राष्ट्रपतींसह सहभागी झाला आहे. आज विराटला त्याच्या सेवा आणि पात्रतेमुळे एक वेगळी ओळख आणि सन्मान मिळाला आहे.

Back to top button