'युपी'तील ज्‍येष्‍ठ नेत्‍याची काँग्रेसला सोडचिठ्‍ठी, शशी थरुर म्‍हणाले, 'काँग्रेस युक्‍त भाजप' - पुढारी

'युपी'तील ज्‍येष्‍ठ नेत्‍याची काँग्रेसला सोडचिठ्‍ठी, शशी थरुर म्‍हणाले, 'काँग्रेस युक्‍त भाजप'

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्‍ठी दिली. त्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. आता यावर ट्‍विट करत काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी भाजपला टोला लागवला आहे.

आरपीएन सिंह यांनी मंगळवारी काँग्रेसच्‍या प्राथमिक सदस्‍यात्‍वाचा राजीनामा दिला. माझी नवीन राजकीय यात्रा सूरु झाली आहे, असे ट्‍विट त्‍यांनी केले. आरपीएन सिंह हे काँग्रेसचे झारखंड राज्‍याचे प्रभार होते. विशेष म्‍हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील स्‍टार प्रचारक यादीत त्‍यांच्‍या नावाचा समावेश होता.

काँग्रेस आता पूर्वी सारखी राहिली नाही. मी एक कार्यकर्ता म्‍हणून भाजपमध्‍ये काम करणार आहे, असे स्‍पष्‍ट करत त्‍यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. असे मानले जात आहेकी, उत्तर प्रदेशमधील पडरौना मतदारसंघात भाजप त्‍यांना उमेदवारी देईल. येथे भाजपला सोडून समाजावादी पार्टीमध्‍ये सहभागी झालेल्‍या स्‍वामी प्रसाद मौर्य यांना ते कडवी झूंज देतील, असे मानले जात आहे.

आरपीएन सिंह यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर शशी थरुर यांनी चारोळी लिहित भाजपवर निशाणा साधला आहे. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं आहे की, “काही जण आपलं घर सोडून जात आहेत. त्‍यांची स्‍वप्‍न काही वेळी असतील. कारण तिकडेही सारे आपलेच आहेत. काँग्रेस युक्‍त भाजपा”

 

Back to top button