Latest

IPL Final 2022 : आमच्यासाठी आयपीएल ‘फायनल’ शेन वॉर्न यांना श्रद्धांजली असेल : संजू सॅमसन

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा परभव करत राजस्थान रॉयल्सच्या संघाने इंडियन प्रिमियर लिगच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने जोस बटलर आणि वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले आहे. राजस्थानने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा ७ विकेट्सने पराभव केला.

आयपीएलच्या वेबसाईटने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जोस बटलर आणि संजू सॅमसन संवाद साधताना दिसत आहेत. संजू सॅमसनने या व्हिडीओमध्ये शेन वॉर्न यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ताे म्‍हणाले, "आयपीएलचा हा हंगाम आम्ही शेन वॉर्न यांच्यासाठीच खेळलो. शेन वॉर्न यांच्यासाठी काही खास करण्यासाठी आम्ही फक्त एक पाऊल दूर आहोत. आयपीएलचा हा हंगाम मोठा होता. ज्यामध्ये अनेक चढ-उतार पहायला मिळाले. आमच्या वेगवान गोलंदाजांनी या हंगामात अतिशय चांगली कामगिरी केली.  . (IPL Final 2022)

फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. जोस बटलरने आयपीएलच्या या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी मोलाची कामगिरी केली आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये जोस बटरलकडे सर्वांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल. आयपीएलच्या पहिल्या हंगातचं शेन वॉर्न यांच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला होता. शेन वॉर्न आयपीएलचे संपूर्ण करियर राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी खेळले होत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गेली अनेक वर्षे ते राजस्थान रॉयल्स संघाचे मेंटॉर म्हणूनही कार्यरत होते. (IPL Final 2022)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT