Latest

आयफोन निर्माता फॉक्सकॉन भारतात बनवणार चिप्स

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तैवानमधील सर्वात मोठी आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनने भारतातील वेदांता कंपनीसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. जागतिक चिप टंचाई दरम्यान या भागीदारी अंतर्गत दोन्ही कंपन्या या चिपचे उत्पादन भारतात करणार आहेत. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे, जी अॅपलचीही मोठी पुरवठादार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, कंपनीने इलेक्ट्रिक वाहने आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे.

900 कोटींची गुंतवणूक

फॉक्सकॉनने एका निवेदनात म्हटले की, त्यांनी वेदांत समूहासोबत भारतात चिप तयार करण्यासाठी करार केला आहे. कंपनीने भारतात इलेक्ट्रॉनिक्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फॉक्सकॉन या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यासाठी 118.7 दशलक्ष पाऊंड्स किंवा सुमारे 900 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या भागीदारी अंतर्गत फॉक्सकॉनची 40 टक्के भागीदारी असेल.

जिओसोबत भागीदारी

कंपनीने म्हटले आहे की, दोन कंपन्यांमधील अशा प्रकारचा हा पहिलाच संयुक्त उपक्रम आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतात सेमीकंडक्टर उत्पादनासाठी इकोसिस्टम तयार करण्याचे स्वप्न साकार करेल. यापूर्वी फॉक्सकॉनने जागतिक स्तरावर चिप्स तयार करण्यासाठी जिओसोबत भागीदारी केली आहे.

भारतात आयफोनचे उत्पादन

सर्वात महत्वाचे म्हणजे Foxconn फक्त भारतात iPhone 12 चे उत्पादन करत आहे. फॉक्सकॉनचा प्लांट तामिळनाडूमध्ये आहे. भारतात iPhone 12 च्या प्रोडक्शनची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. काही दिवसांपूर्वी, एका अहवालात असेही म्हटले की, अॅपल ने भारतात iPhone 13 चे चाचणी उत्पादन सुरू केले आहे, जे फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये देखील होत आहे. आयफोन 11 आणि आयफोन 12 चे भारतात फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये आधीच उत्पादन केले जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT