Latest

इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडली, ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द

मोहन कारंडे

अहमदनगर; पुढारी वत्तसेवा : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले असून 30 मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

विनोदी किर्तनकार म्हणून लोकप्रिय असलेले इंदुरीकर महाराज यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांच्याकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात त्यांनी आपल्या प्रकृतीबद्दल सांगतानाच वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्वनियोजित कार्यक्रम पार पडतील असे म्हटले आहे.

कार्यक्रम रद्द करावे लागल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत, असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT