Latest

Indrani Mukherjee : इंद्रानी मुखर्जीची जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्रानी मुखर्जी (Indrani Mukherjee) हिने आज (दि.१०) गुरुवारी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने १४ तारखेला निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. एकेकाळी मीडिया क्षेत्रात मोठा दबदबा असलेली इंद्रानी मुखर्जी दीर्घ काळापासून तुरुंगात आहे.

आपली मुलगी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा अलीकडेच इंद्रानीने केला होता. सदर दाव्याबाबत सीबीआयला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले जावेत, अशी विनंती इंद्रानीने वकील सना खान यांच्यामार्फत विशेष न्यायालयाकडे केली होती.

Indrani Mukherjee : जून 2021 मध्ये काश्मीरच्या श्रीनगरमधील ही घटना

इंद्रानीच्या निवेदनात एका महिलेचा उल्लेख आहे. शीना बोराच्या चेहऱ्याशी साम्य असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तुम्ही शीना बोरा आहात का? अशी विचारणा केली असता त्या महिलेने सकारात्मक उत्तर दिले होते. जून 2021 मध्ये काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ही घटना घडली होती.

संबंधित महिलेचे नाव आशा कोरके असून ती माजी पोलीस निरीक्षक आहे, असे इंद्रानीने निवेदनात म्हटले आहे. इंद्रानी तसेच तिचा तत्कालीन पती पीटर मुखर्जी यांना शीना बोरा हिची हत्या केल्याच्या आरोपावरून 2015 साली अटक करण्यात आली होती.

SCROLL FOR NEXT