Latest

IndiGo : एअर इंडिया नंतर इंडिगोसह अन्य एअरलाइन्सकडून १,२०० विमान खरेदीचा अंदाज : CAPA

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : एअर इंडियाची ४७० विमानांची खरेदी ही भारतीय विमान वाहतूक उद्योगाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यानंतर येत्या 24 महिन्यात इंडिगोसह विमान वाहतूक करणा-या अन्य कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात विमान खरेदी करू शकतात. हा आकडा 1000 ते 1200 च्या घरात असू शकतो आणि इंडिगो यामध्ये सर्वात आघाडीवर असू शकते, असा अंदाज सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशनने (CAPA)  वर्तवला आहे.

CAPA ने आपल्या अहवालात पुढे असेही म्हंटलं आहे की, "भारत बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर आहे. भारत २१ व्या शतकातील जागतिक विमान वाहतूक बाजारपेठ मध्ये महत्त्वाची जागा घेवू शकते". वाचा सविस्तर बातमी.

एअर इंडियाने सुमारे ५०० नवीन विमान खरेदी साठी एक मोठा करार केला आहे. हा करार अंदाजे  100 अब्ज डॉलर पेक्षा अधिक किंमतीचा आहे. एअर इंडियाने दिलेली ऑर्डर ही आजपर्यंतच्या कोणत्याही विमान कंपनीने दिलेली सर्वात मोठी ऑर्डर ठरु शकते. आता सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशनने  (CAPA) अंदाज  वर्तवला आहे की," इंडिगो (IndiGo) कडून मोठ्या प्रमाणात विमाने खरेदी करण्याची शक्यता आहे."

इंडिगोने (IndiGo) कोविडच्या आधी सुमारे ३०० विमानांची खरेदी करण्याची योजना आखली होती. पण कोरोना महामारीमुळे ती  पुढे ढकलण्यात आली होती. आता पूर्वीच्या कल्पनेपेक्षाही मोठी ही खरेदी असू शकते. जवळपास 500 च्या आसपास विमाने खरेदी केली जाऊ शकतात, असे नुकतेच प्रसिद्ध झालेल्या CAPA च्या  'इंडिया: ग्लोबल एव्हिएशनचे पुढील वाढीचे इंजिन' अहवालात म्हंटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT