Latest

BrahMos : फिलिपाईन्सला भारतीय ‘ब्रह्मोस’; प्रस्ताव मंजूर

backup backup

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : सागरी क्षेत्रात चीनची कोंडी करण्याची जबरदस्त व्यूहरचना भारताने तयार केली आहे. भारताने सर्वात वेगवान सुपरसोनिक युद्धनौकाभेदी क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस'चे जाळे 'ड्रॅगन'ला अडकविण्यासाठी विणले आहे. चीनचे शत्रूराष्ट्र असलेल्या फिलिपाईन्सला 'ब्रह्मोस' निर्यात करण्याच्या प्रस्तावाला भारत सरकारने शनिवारी मंजुरी दिली. (BrahMos)

हा एकूण व्यवहार 37.5 कोटी डॉलर्सचा (2 हजार 789 कोटी रुपये) आहे. फिलिपाईन्सच्या संरक्षण विभागाने 'ब्रह्मोस एअरोस्पेस'ला पत्र पाठविले असून, पुढच्या आठवड्यात दोन्ही देशांदरम्यान करारावर स्वाक्षरी होईल, अशी शक्यता आहे. चीनला या व्यवहारामुळे मोठा धक्का बसला आहे.

सागरी हद्दीबाबतचे सर्व प्रचलित संकेत, आंतरराष्ट्रीय कायदे झुगारून दक्षिण चीन समुद्रावर आपलाच एकट्याचा हक्क, ही चीनची मिजास या व्यवहारामुळे धोक्यात येणार आहे.

सागरी हद्दीवरून फिलिपाईन्सचेही चीनशी वाद आहेत… आणि मुख्य म्हणजे फिलिपाईन्स आपल्या किनारपट्टीच्या भागांमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे. अर्थात, प्रसंग उद्भवल्यास चिनी युद्धनौकांचा लक्ष्यभेद हेच यामागे फिलिपाईन्सचे एकमेव उद्दिष्ट आहे.

BrahMos : भारत बनला शस्त्रास्त्र निर्यातदार

फिलिपाईन्ससोबत झालेल्या व्यवहारामुळे भारत हा आता शस्त्रास्त्र निर्यातदार देशांच्या यादीत जाऊन बसला आहे.
हा पहिलाच व्यवहार असून, इंडोनेशिया आणि व्हिएतनामशीही असाच व्यवहार होईल, असे संकेत मिळाले आहेत.

SCROLL FOR NEXT