Latest

India vs Australia ODI Series : वर्ल्डकप आधी टीम इंडियाचा दमदार सराव; ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळणार वन-डे मालिका

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर बीसीसीआयने विविध मालिकांची घोषणा करण्याचा सपाटाच लावला आहे. वेस्ट इंडीज दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर, दौऱ्यावरील संघाची घोषणा ही केली. या पाठोपाठ आयर्लंड दौऱ्याची देखील घोषणा झाली आहे. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेची घोषणा केली आहे. (India vs Australia ODI Series)

आशिया कपनंतर टीम इंडिया जास्तीजास्त वन-डे सामने खेळण्याच्या तयारीत आहे. जेणे करून वर्ल्डकप आधी संघाचा चांगला सराव होईल. आशिया कप दि.१७ सप्टेंबरला संपणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये मीडिया राईट्सचा लिलाव झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या मीडिया राईट्स सर्कलमध्ये खेळवली जाणार आहे. 'मीडिया राईट्सचे टेंडर लवकरच निघेल. आम्ही ऑगस्टपर्यंत मीडिया राईट्सची प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आखत आहे' (India vs Australia ODI Series)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही आशिया कपनंतर होणार आहे. आशिया कप हा १७ सप्टेंबरला संपणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका वर्ल्डकप सराव सामन्यांच्या आधी खेळण्यात येईल. भारतासाठी ही मालिका वर्ल्डकपसाठी महत्वाची आहे. भारताचे वर्ल्डकप मोहिम ही ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानेच होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यांत आतापर्यंत एकूण १४६ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यात ऑस्ट्रेलिया विजय मिळवण्यात आघाडीवर आहे. त्यांनी ८२ सामने जिंकले आहेत. तर, भारताला फक्त ५४ सामन्यामध्ये विजय मिळवता आला आहे. या दोन्ही संघात शेवटची द्विपक्षीय मालिका ही मार्च २०२३ मध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ अशी जिंकली होती.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT